top of page
logo.png

Juice vs Soup: Which Nutritious Option Is Better for Your Health?

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 5 min read

काय उत्तम - ज्यूस का सूप ??

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज या भागामध्ये आपण ज्यूस प्यावं का सूप या विषयी ऊहापोह करणार आहोत - - - दोन्हीही पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात - - - अगदी सर्वांच्याच आवडीचे असतात - - - अनेक प्रकार असल्यामुळे आपल्या आवडीनिवडीनुसार सेवन केले जातात - - परंतु यापैकी कोणते आपल्या शरीरास -- स्वास्थ्यास लाभदायक आहे आणि त्यांचे सेवन केव्हा करावे ??? याविषयी बघणार आहोत - - -

ज्यूस प्रामुख्याने विविध फळांचे केले जातात तर सूप हे विविध प्रकारच्या भाज्यांचे केले जातात - - - ज्यूस आणि सूप हे दोन्ही प्रकार भारतीय आहार परंपरे मध्ये आहेतच - - - - परंतु सध्याच्या काळामध्ये सूप हा प्रकार अतिशय लोकप्रिय होत चालला आहे आणि अनेक व्यक्ती हा भारतीय प्रकार नसून विदेशातून आला आहे असं समजून लोकप्रियता मिळवत आहे - - - - - -   कित्येक व्यक्ती सूप हा प्रकार बाहेर जेवायला गेल्यानंतर म्हणजेच हॉटेलिंग करतांना - - - जेवणाच्या अगोदर सेवन करतात - - - तर ज्यूस च्या बाबतीत विचार केल्यास - - - ताज्या फळांपासून केलेले ज्यूस शक्यतो घरीच सेवन केले जातात - - - क्वचित प्रसंगी बाहेर हॉटेलमध्ये किंवा रसवंती वर उसाच्या रसाच्या स्वरूपामध्ये सेवन केले जातात - - - उन्हाळ्यात आंब्याचा ज्यूस - लिंबू पाणी - अननस - मोसंबी इत्यादींचे ज्यूस देखील बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात

पोषक तत्वांचा विचार केल्यास सूप आणि ज्यूस दोनही परिपूर्ण आहेत - -  फक्त असे पदार्थ शक्यतो ताजे - - स्वतःच्या निगराणीखाली बनवलेले असल्यास उत्तम - - - बाजारामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असल्यामुळे त्यांचा वापर करू नये - - -  तसेच बाजारामध्ये उपलब्ध असणारे हे पदार्थ स्वादिष्ट जरूर असतील परंतु पोषक तत्वाच्या बाबतीत लाभदायक निश्चित नसतात - - - कारण त्यांच्यात गोडावा निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे केमिकल्स टाकले जातात - - -  तसेच चवीच्या दृष्टीने किंवा रंगसंगतीसाठी विविध रंगाचे केमिकल्स टाकले जातात - - -  अनेक वेळेला दुधासोबत ज्यूस दिला जात असतो आणि निश्चितच हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक नसते - - - -     शक्यतो ज्यूस हा फळांचा बनवला जातो परंतु सध्या काही व्यक्ती भाज्यांचा देखील ज्यूस बनवून घेत असतात असा ज्यूस बनवताना फायबर गाळून वेगळे केले जातात - - -  - गाळल्यामुळे स्वाद उत्कृष्ट होतो परंतु त्यातील फायबर्स हे निघून गेल्यामुळे - - -  अनेक पोषक तत्व आपणास प्राप्त होत नाहीत - - - -  मात्र सूप बनवत असताना ताज्या भाज्या शिजवून घेतल्या जातात त्या स्मेश केल्या जातात आणि त्याच्यामध्ये असणारे सर्व पोषक घटक फायबर्स इत्यादी - - -    जसेच्या तसे राहत असल्यामुळे त्याचा पूर्ण लाभ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मिळत असतो

अनेक वेळेला ज्यूस सेवन करत असताना तो बर्फ टाकून सेवन केला जातो म्हणजे थंड ज्यूस सेवन केला जातो तर सूप हा प्रकार गरम गरमच सेवन केला जातो आपल्या आयुर्वेद शास्त्रानुसार उष्ण पदार्थ आपल्या पचन क्रियेसाठी उत्तम असतात - - - -  तर थंड पदार्थ पचवण्यासाठी थोडा अधिक वेळ लागत असतो

ज्यूस बाबतीत विचार केल्यास फळांमध्ये नैसर्गिक साखर उपलब्ध असते आणि ती आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते तर सूप बनवताना शक्यतो त्यात वरून साखर मिसळली जाते आणि ते आपल्या आरोग्यासाठी तेवढे उत्तम नसते

म्हणजेच दोन्हीही गोष्टींचा विचार केल्यास काही गोष्टी ज्यूस संदर्भात उत्तम आहेत तर काही सूप संदर्भात उत्तम आहेत - - -  - -  मग आपण नेमकं दोघांमध्ये श्रेष्ठता श्रेष्ठत्व कसं ठरू शकतो

साधारणतः ज्या वेळेला आपल्याला थकवा घालवायचा आहे - - -  ताजतवांना वाटण्याची आवश्यकता आहे अशा वेळी आपण ज्यूस घेणं हे उत्तम असतं जसं आपण लॉन्ग टेनिस - - -  टेबल टेनिस - - -  क्रिकेट इत्यादी खेळ खेळत असतो त्या वेळेला आपल्याला ताकदीसाठी ज्यूस हा उत्तम असतो

तसेच उन्हाळ्याचे दिवसात जे व्यक्ती उष्णतेत काम करत आहेत - - -  ज्यांच्या शरीरातील पाणी कमी झालेलं आहे - - -   अशा व्यक्तींसाठी ज्यूस हा उत्तम असतो

ज्या व्यक्तींना फायबर युक्त आहाराची गरज आहे  - - - -   ज्यांचे पोट साफ होत नाही - - - -   ज्यांची पचनक्रिया उत्तम करावयाची आवश्यकता आहे  - - - -  अशांनी तसेच भूक वाढीसाठी - - - -  भोजनाच्या अगोदर सूप सेवन करणे हा एक उत्तम पर्याय आहे

अशा पद्धतीने आपण ज्यूस आणि सूप दोघांचाही आरोग्यवर्धनार्थ उपयोग करून घेऊ शकतो

 

 

 

Juice vs Soup: Which Nutritious Option Is Better for Your Health?

A glass of fresh juice can feel refreshing, while a bowl of soup feels comforting and filling. Both can be healthy, but they serve different needs.

This Juice vs Soup comparison is less about choosing one forever and more about knowing when each works best.

Juice gives quick hydration and nutrients

Fresh juice made from fruits or vegetables can provide vitamins, minerals, antioxidants, and fluids in an easy-to-digest form. Amla juice, mosambi juice, carrot juice, and watermelon juice are common Indian choices.

Juice is especially useful:

After sports or a workout

During hot weather

When appetite is low

As a light mid-morning drink

The downside is that juicing removes much of the fibre. Fruit-heavy juices can also raise sugar intake quickly. For a healthier glass, use more vegetables, add lemon or ginger, and avoid added sugar.

Soup is filling, warm, and more balanced

Soup often gives better satiety because it keeps fibre, water, and nutrients together. A homemade bowl of dal soup, vegetable clear soup, rasam, tomato soup, or chicken broth can support digestion and make a light meal.

Soup can include:

Vegetables for fibre

Lentils or beans for protein

Spices like pepper, cumin, ginger, and turmeric

Healthy fats in small amounts

This makes soup a strong choice for dinner, cooler weather, recovery days, or times when you want something gentle but nourishing.

Ayurveda favours warmth for digestion

In Ayurveda, warm foods are often seen as easier on digestion, especially for people with weak appetite, bloating, or cold sensitivity. That gives soup an advantage in many everyday meals.

Cold juice may still suit hot afternoons, post-exercise thirst, or people who naturally tolerate cooling foods well. Balance matters: listen to your body, the season, and your activity level.

Fresh and homemade is better

Store-bought juices and soups may contain excess salt, sugar, preservatives, or flavour enhancers. Homemade versions give more control over freshness, ingredients, and portion size.

Choose juice when you need quick hydration. Choose soup when you need fullness, warmth, and a more complete meal.

FAQ

Is soup healthier than juice?

Often, yes, because soup usually contains fibre and can include protein. Juice is still useful for quick fluids and micronutrients.

Can I drink juice every day?

Yes, if it is fresh, unsweetened, and portion-controlled. Whole fruits should still be part of the diet.

Is soup good for weight management?

Soup can help because it is filling and lower in calories when homemade with vegetables, dal, or lean protein.

Which is better in summer?

Fresh juice may feel better in peak heat, especially after activity. Light soups like rasam or clear vegetable soup can also work well.

Food choices are personal. This article is for general information, not medical advice. For daily health, rotate both wisely: juice for refreshment, soup for nourishment.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page