Garlic Health Benefits and Side Effects in Simple Words
- Satish Shindadkar
- Aug 2
- 4 min read
लशुन-लसूण खा निरोगी रहा
नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण लसूण बद्दल माहिती घेणार आहोत - - - - -
लसूण ज्याला आयुर्वेदात लशुन किंवा रसोन असे म्हटले जाते.
लसूण तामसिक आहारात मोडला जातो म्हणून अनेक व्यक्ती त्याचे सेवन करीत नाही तर कित्येक व्यक्ती काही काळासाठी याचे सेवन बंद करतात.
अनेक पूजा – पाठ किंवा सणांमध्ये लसूण वर्ज्य असतो, या सर्व गोष्टी आपापल्या जागी ठीक आहेत तरी पण योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन केलेला लसूण हा आपल्या शरीर प्रकृतिसाठी उत्तम आहार घटक आहे.
अनेकांना याचा गंध आवडत नाही, तरीपण आपल्या शरीरासाठी लसूण सेवन करणे आपल्या हिताचे असते.
पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतुंमध्ये लसूण खाणे गरजेचे असते तर उन्हाळ्यात शक्यतो वर्ज्य करावा अथवा प्रमाण कमी करावे. थोडक्यात लसूण सेवन फायदे आणि तोटे आपण पाहू या -- --
१. लसूण सेवनाने घाम व्यवस्थित येऊन त्या द्वारे शरीरातील विष घटक बाहेर टाकले जातात आणि शरीर विष मुक्त होते.
२. शरीरातील कोलेस्ट्रॉल चा स्तर कमी करण्यात लसूण उपयुक्त असल्याने पर्यायाने ह्रदय साठी उपयुक्त आहे.
३. इंसुलिन तयार करण्यासाठी देखील लसूण उपयुक्त असल्याने मधुमेह असणाऱ्या रुग्णांना किंवा मधुमेह विकार लवकर उद्भवू नये म्हणून देखील याचा फायदा होतो.
४. रोग प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी देखील लसूण उपयुक्त आहे.
५. सर्दी-खोकला असतांना लसणाची चटणी सेवन करावी.
६. पचन तंत्र व्यवस्थित ठेवण्यासाठी लसूण उत्तम आहार घटक आहे.
७. दात दुखत असल्यास लवंग आणि लसूण एकत्र कुटून दुखणाऱ्या ठिकाणी लावावे, तात्काळ दुखणे बंद होते.
८. गर्भावस्थेत लसूण खावा किंवा न खावा या बद्दल अनेक मत भेद आहेत, पण जर पावसाळा असेल किंवा कडक थंडी असेल तर - - - - - -
लसूण खायला हरकत नसते या मुळे माता आणि गर्भ दोघांचे स्वास्थ्य उत्तम राहते आणि प्रसूती कालात - - - - - - - - -मातेचा रक्तदाब व्यवस्थित राहून सुलभ प्रसूती होण्यास मदत होते.
या नंतर आपण काही तोटे पाहू या - - -
काही व्यक्तींना लसूण अधिक सेवन केला असता - - - - - - - तोंडात, पोटात, छातीत आग होणे, - - - - मळमळ होणे, - - - - पोटात वायू धरणे, - - - - - पोट फुगल्या सारखे वाटणे, - - - - - पोट अधिक साफ होणे व त्यामुळे थकवा वाटणे अशी लक्षणं दिसतात. - - - - - -- - शक्यतो हि लक्षणं - - - - - - कच्चा लशुन खाल्ला तरच आढळतात म्हणून कच्चा लसूण खाणे टाळावे.
एखादे शस्त्र कर्म (Operation) झाल्यावर काही दिवस लसूण खावू नये - - - - तसेच त्या आगोदर पण काही दिवस लसूण वर्ज्य करावा - - - - - कारण उष्ण असल्याने रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
काही व्यक्ती लसूण वाटून त्वचेवर लावतात, पण असे करणे त्वचेचा दाह आणि अन्य विकारांना आमंत्रण देणे ठरते.
गर्भावस्था आणि स्तनपान – साधारणत: लसूण गर्भावस्थेत आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी सुरक्षित असतो तरीपण त्याचे या अवस्थेत अति सेवन टाळावे.
ज्या व्यक्तींना acidity – अम्लपित्त, पोटाचे अल्सर इ. आजार आहेत त्यांनी लसूण सेवन टाळावे.
लघवीतून, नाकातून, संडास मार्गे रक्त जात असेल तर लसूण टाळावा.
Garlic Health Benefits and Side Effects in Simple Words
Garlic is small, strong, and found in almost every Indian kitchen. In Ayurveda, garlic is known as Lashun or Rasona. It is valued not only for taste, but also for its warming nature and possible health-supporting properties.
Garlic contains natural sulphur compounds, including allicin, which gives it its sharp smell and many of its benefits. This post is for general information only. If you have a medical condition or take regular medicines, speak to a doctor before using garlic as a remedy.
Why eating garlic can be good for health
Garlic is often used in home remedies because it may support the body in several simple ways.
It may help the body sweat
Garlic has a warming effect. In traditional use, this is believed to support sweating, which may help the body feel lighter during seasonal illness.
It may support healthy cholesterol levels
Research suggests garlic may help support heart health by having a mild effect on cholesterol levels. It should not replace prescribed medicines, but it can be part of a balanced diet.
It may be useful for people with diabetes
Garlic may support better blood sugar control when eaten as part of a healthy meal plan. People taking diabetes medicines should be careful, as diet changes can affect sugar levels.
It may improve immunity
Garlic is known for its natural protective compounds. Regular, moderate intake may help the body fight common infections.
It may reduce cold and cough discomfort
Many Indian households use garlic in soups, rasam, or warm food during cold and cough. It may soothe the body and support recovery.
It may support digestion
Garlic can improve appetite and may help digestion when used in small amounts in cooked food.
Possible side effects of garlic
Garlic does not suit everyone. Eating too much may cause:
Burning sensation in the stomach or chest
Nausea
Gas or bloating
Bad breath
Acidity in sensitive people
During pregnancy, excess garlic intake should be avoided. Small amounts in food are usually common, but medicinal use should be discussed with a doctor.
How to eat garlic safely
Use garlic in moderation. Add it to dal, sabzi, chutney, soup, or tadka. Cooked garlic is gentler on the stomach than raw garlic. If raw garlic causes burning or nausea, avoid it.
FAQ
Is raw garlic better than cooked garlic?
Raw garlic has stronger compounds, but it can irritate the stomach. Cooked garlic is easier to digest.
Can garlic cure diabetes or cholesterol?
No. Garlic may support health, but it does not cure diabetes or high cholesterol.
How much garlic is safe daily?
For most adults, small food amounts are safe. One to two cloves may suit many people, but tolerance varies.
Should pregnant women eat garlic?
Garlic in normal food amounts is common. High intake or garlic supplements should be avoided unless a doctor advises it.
Takeaway
Garlic, or Lashun, is a powerful kitchen ingredient with many possible benefits. Use it wisely, keep the quantity moderate, and listen to your body.

Comments