Chyawanprash
- Satish Shindadkar
- Aug 6
- 6 min read
च्यवनप्राश
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - अगदी लहान खेड्यात देखील आणि किराणा दुकानात मिळणार च्यवनप्राश या विषयी बघणार आहोत - - - -
च्यवनप्राश मध्ये काय जादू आहे
अनेक व्यक्ती च्यवनप्राश का घेतात
तो कसा तयार करतात
त्याचा खरा उपयोग कोणाला आहे
च्यवनप्राश सर्वांनीच खावा का
च्यवनप्राश कोणी सेवन करू नये
याचे काही विपरीत परिणाम आहेत का?
इत्यादी अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतात
च्यवनप्राश हे नाव कसं पडलं ???? याविषयी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे - -
च्यवन नावाच्या ऋषींनी त्यांना तारुण्य प्राप्त करून घेण्यासाठी हे औषध तयार केले आणि स्वतःवर त्याचा प्रयोग केला आणि ते खरोखर तरुण झाले
त्यामुळे च्यवनप्राश हे च्यवन ऋषींनी प्राशन केलेला कल्प म्हणून याचं नाव च्यवनप्राश असे पडले
च्यवनप्राश मध्ये आवळा ही प्रमुख औषधी असून अन्य अनेक औषधी त्यात आहेत
प्रामुख्याने मनुका / / अडुळसा मूळ / / वेलची पुष्करमुल - - गोखरू - - - नागरमोथा - - रिंगणी - - - कोहळा - - - गुळवेल - - हिरडा - - - बेहडा - - - काकड सिंगी - - पिंपळी – दालचिनी - - शुद्ध तूप - - खडीसाखर - - - अग्नि मंथ - - - गम्भारी - - पुनर्नवा - - विदारीकंद - - - मध - - - वंशलोचन - - - तेजपान - - - - नागकेशर इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो
वर वर्णन केलेल्या औषधी वनस्पतीं पैकी काहींचा काढा करून - - - - त्यात आवळे शिजवले जातात - - - - नंतर आवळ्या च्या बिया आणि रेषा बाजूला करून तयार झालेला लगदा तेल आणि तुपात परतला जातो
नंतर काढा आणि खडीसाखर यांचा एकतारी पाक तयार करून त्यात आवळ्याचा लगदा म्हणजेच मावा टाकून उष्णता देणे बंद केले जाते
नंतर थंड झाल्यावर त्यात वेलची / / दालचिनी इत्यादी सुगंधी द्रव्य / / / मधासह टाकली जातात - - - - - - या सुगंधी द्रव्यांच्या एकत्रीकरणामुळे चवनप्राशला सुगंध येतो आणि नंतर हे मिश्रण काही दिवस मुरवत ठेवावे लागते
अशा प्रकारे तयार झालेले च्यवनप्राश विशेषतः - - - - - खोकला विकार नष्ट करते
तसेच जे व्यक्ती दुर्बल आहेत - - - - - वृद्ध आहेत - - - - बालक आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत उपयुक्त आहे
तसेच स्वरभेद म्हणजे गळ्याचे विकार - - - - छातीचे अर्थात फुफ्फुसांचे म्हणजेच लंग चे विकार - - - हृदयरोग - - - - - वातरक्त आणि मूत्राशय तसेच शुक्र संबंधित दोषांना दूर करण्याचे सामर्थ्य यात असते
च्यवनप्राश किती सेवन करावा ????? याबद्दल ग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख नसला तरी - - मनुष्याची पचनशक्ती बघून - - - त्याची मात्रा वैद्यकीय सल्ल्याने ठरवावी
योग्य मात्रेत सेवन केलेला चवनप्राश - - - - स्मरणशक्ती वाढवणे - - - - शरीराचे तेज वाढवणे - - - - आरोग्य आणि आयुष्य वाढवणे तसेच इंद्रियांमध्ये बल निर्माण करणे - - - - भूक चांगली लागणे आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे इत्यादी कार्य करते
या सर्व गुणांची प्राप्ती आपणास हवी असेल तर च्यवनप्राश शास्त्रशुद्ध पद्धतीनेच तयार केलेला असावा - - - - तसेच त्यात ज्या वनस्पती टाकण्यात आलेल्या आहेत त्या सर्व योग्य असायला हव्यात - - - - -
आजच्या घडीला बाजारात - - - - काजू बदाम इत्यादी ड्रायफूट्स टाकलेले चवनप्राश
तसेच कॅप्सूल फॉर्ममध्ये - - - - चूर्णाच्या रूपामध्ये चवनप्राश - - - विकले जाते शास्त्रानुसार च्यवनप्राश हा अवलेह स्वरूपात असावा असा उल्लेख आहे म्हणजेच तो - - - - सेमी सॉलिड / / / पातळ / / / / /चाटून खाण्यासारखा योग असावा
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज बाजारात स्पेशल च्यवनप्राश / / / / सुवर्ण भस्मयुक्त चवनप्राश / / / / मकरध्वजयुक्त चवनप्राश इत्यादी अनेक नावांनी किंवा स्पेशल हा शब्द जोडून किंवा आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये दिलेला फॉर्मुल्यात बदल करून वेगवेगळे पाठ उपलब्ध होत आहेत
जर आपणास चवनप्राश शास्त्रशुद्ध पाहिजे असेल तर वैद्यकीय सल्ल्यानेच त्याचा वापर करणे अपेक्षित आहे
च्यवनप्राश मध्ये साखर असल्याने मधुमेही रुग्णांनी घेणे टाळावे,
च्यवनप्राश मध्ये - - क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते आणि क जीवनसत्वाने उत्पन्न झालेली व्याधी एखाद्या व्यक्तीला असल्यास त्यांनी च्यवनप्राश घेणे टाळावे
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी देखील च्यवनप्राश सेवन करणे टाळावे किंवा अल्प मात्रेत सेवन करावा
अशा प्रकारे शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्मित च्यवनप्राश सेवन केल्यास - - - - - निश्चितच शास्त्रात वर्णन केलेल्या सर्व व्याधींपासून त्यांची मुक्तता होऊ शकते
Chyawanprash
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at Chyawanprash, which is available even in very small villages and at grocery stores - - - - -
What is the magic in Chyawanprash?
Why do many people take Chyawanprash?
How is it prepared?
Who truly benefits from it?
Should everyone eat Chyawanprash?
Who should not consume Chyawanprash?
Does it have any adverse effects?
Many such questions arise in many people's minds.
How did the name Chyawanprash come about???? This is mentioned in Ayurvedic texts - -
A sage named Chyawan prepared this medicine to regain his youth and tested it on himself, and he truly became young again.
Therefore, it came to be called Chyawanprash, meaning the preparation consumed by Sage Chyawan.
The main medicinal ingredient in Chyawanprash is amla, along with many other herbs.
These mainly include raisins / / Malabar nut root / / cardamom Pushkarmool - - Gokhru - - - nut grass - - brinjal - - - ash gourd - - - Guduchi - - Haritaki - - - Bibhitaki - - - Kakad Singi - - long pepper – cinnamon - - pure ghee - - rock sugar - - - Agnimantha - - - Gambhari - - Punarnava - - Vidarikand - - - honey - - - bamboo manna - - - bay leaf - - - - Nagkesar and many other ingredients.
A decoction is prepared from some of the medicinal plants described above - - - - and amla fruits are cooked in it - - - - then the seeds and fibers of the amla are removed, and the resulting pulp is sautéed in oil and ghee.
Then a one-string syrup is prepared from the decoction and rock sugar, the amla pulp is added to it, and heating is stopped.
After it cools, aromatic substances such as cardamom / / cinnamon etc. / / / are added along with honey - - - - - - The combination of these aromatic substances gives Chyawanprash its fragrance, and then this mixture has to be left to mature for a few days.
Chyawanprash prepared in this way especially - - - - - eliminates cough disorders.
It is also extremely useful for people who are weak - - - - - elderly - - - - children.
It also has the ability to relieve hoarseness, meaning throat disorders - - - - chest, that is, lung disorders - - - heart disease - - - - - gout and disorders related to the urinary bladder as well as semen.
How much Chyawanprash should be consumed???? Although there is no clear mention of this in the texts - - the dosage should be determined with medical advice - - - according to a person's digestive capacity.
Chyawanprash consumed in the proper quantity - - - - improves memory - - - - enhances the body's radiance - - - - promotes health and longevity as well as strengthens the senses - - - - improves appetite and boosts the body's immunity, among other benefits.
If you want to obtain all these benefits, then the Chyawanprash should be prepared strictly according to the traditional method - - - - and all the herbs added to it should be the correct ones - - - - -
Today, in the market - - - - Chyawanprash containing dry fruits such as cashews and almonds,
as well as Chyawanprash in capsule form - - - - and in powder form - - - is sold. According to the traditional texts, Chyawanprash should be in the form of an avaleha, meaning it should be - - - - semi-solid / / / thin / / / / / suitable for licking.
Another important point is that today, products are available in the market under names such as Special Chyawanprash / / / / Chyawanprash with Suvarna Bhasma / / / / Chyawanprash with Makardhwaj, etc., or by adding the word "special," or by modifying the formula given in Ayurvedic texts.
If you want Chyawanprash prepared according to the traditional method, it is advisable to use it only with medical guidance.
Since Chyawanprash contains sugar, diabetic patients should avoid taking it.
Chyawanprash contains a large amount of vitamin C, and if a person has a disorder caused by vitamin C, they should avoid taking Chyawanprash.
People with a Pitta constitution should also avoid consuming Chyawanprash or consume it only in small quantities.
Thus, if Chyawanprash prepared according to the traditional method is consumed - - - - - one can certainly be freed from all the disorders described in the traditional texts.

Comments