Batti Varieties Explained How Steamed, Roasted, and Fried Batti Compare
- Satish Shindadkar
- Aug 5
- 4 min read
बट्टी चे अनेक प्रकार कोणता सेवन करावा
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
बट्टी या पदार्थाविषयी बघणार आहोत
श्रावणातील दर सोमवारी सकाळी आहारामध्ये
अनेक पंक्तींमध्ये आहारामध्ये
बट्टी हा प्रकार आपणास बघावयास मिळतो
बट्टी हा प्रकार वाफवून
तळून
भाजून बनवला जातो
काही लोक याला बाटी असं म्हणतात
काही रोडगे म्हणतात तर काही
बाफले म्हणतात
हे सर्व प्रकार जवळपास थोड्याफार अंतराने सारखेच आहेत
गव्हाच्या पिठापासून हा प्रकार बनतो
गव्हाच्या पिठात थोडे मीठ आणि पाणी घालून मळून घेतले जाते आणि या पिठाचे छोट्या चेंडूच्या आकाराचे गोल गोळे बनवले जातात
काही व्यक्ती पाण्या सोबत दही टाकतात
घरी बनवायचे असेल तर किती लोक ओव्हनमध्ये यास गरम करतात
बाहेर पंगतीत मोठ्या प्रमाणात बनवत असताना
थोडं वाफवून
त्याचे तुकडे करून
तळले जातात / / / भाजले जातात किंवा तुपामध्ये परतवले जातात
दाल बाटी आणि त्यावर साजूक तूप हा एक छान बेतच आहे
खान्देशात बट्टी याची चव निराळीच असते ह्या
बट्टी सोबत वांग्याची भाजी हा देखील एक उत्तम आहाराचा प्रकार ठरतो
कमीत कमी तेलात खुसखुशीत बट्टी आणि आंबट गोड वरण हे
देखील अनेक ठिकाणी सेवन केलं जातं
वेगवेगळ्या पद्धतीच्या बाटी / / / बट्टी
बाफले / / / रोडगे आहेत मग त्यापैकी
आपल्या आरोग्यासाठी कोणता प्रकार सेवन करायला हवा
असा प्रश्न मला अनेकांनी विचारला त्यामुळे आज यावर चर्चा करणार आहोत
राजस्थानी व्यक्तींच्या अनेक कार्यक्रमांमध्ये दाल बाटी ज्याला
चुरमा असे म्हणतात आणि त्यासोबत साजूक तूप हाच बेत असतो
कोणत्याही प्रकारचे बट्टीच्या संदर्भातील मेनू असो
शक्यतो असे सर्व मेनू वाफवून / / / भाजून घेतलेले असतील तर ते
उत्तम असतात
तळलेले मेनू देखील युवकांसाठी पचन क्षमतेनुसार योग्यच असू शकतात
परंतु सध्या व्यापारीकरणामुळे अनेक ठिकाणी
अशा या बटींमध्ये सोडा टाकला जातो
जेणे करून त्या बट्टी चांगल्या फुगाव्यात
खुसखुशीत व्हाव्यात आणि हाच सोडा
आपल्या शरीरासाठी घातक असतो म्हणून
बट्टी प्रकारांमध्ये सोडा नसल्यास त्या उत्तम
बट्टी पचायला थोडी जड होऊ शकते म्हणून
त्याच्यासोबत देशी तूप असल्यास उत्तम
कित्येक समारंभांमध्ये / / / कार्यक्रमांमध्ये बट्टी + वरण आणि वांग्याची भाजी
असा बेत असतो त्या वेळेला
त्यासोबत तूप घेणे सोयीस्कर नसत
हिवाळ्याचे दिवसांत सकाळच्या आहारात
वरण बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजी जर असेल तर
तो मेनू आपल्या आरोग्यासाठी योग्य असू शकतो
ज्या व्यक्तींना आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटीचा त्रास अधिक
प्रमाणात असेल अशांनी वरण बट्टी तसेच
वरण बट्टी वांग्याची भाजी हे सेवन करणे टाळावे आणि
जर आपल्याला हे प्रकार आवडतच असतील तर
बट्टी आणि त्यासोबत साजूक तूप हे मिश्रण आपण
घरच्या घरी सेवन करू शकतो कारण डाळ
किंवा वांग्याची भाजी हे पित्त वाढवणारे असल्यामुळे
आम्लपित्त असणाऱ्या व्यक्तींसाठी अयोग्य ठरत असते
सर्व बट्टी प्रकार हे पचायला थोडे जड असतात आणि
चविष्ट असल्यामुळे
थोडे अधिक प्रमाणात सेवन केले जातात म्हणून
योग्य प्रमाणातच
आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करून सेवन केल्यास
निश्चितच आरोग्यासाठी चांगले ठरतात
बट्टी हा प्रकार शक्यतो हिवाळ्यामध्ये सेवन केल्यास
कोणत्या प्रकारची बाधा निर्माण होऊ शकत नाही आणि
महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार सकाळच्या आहारामध्ये विशेषत:
भाजून किंवा वाफवून तयार केल्यास उत्तम
अन्यथा अनेक पचनाच्या संदर्भातील लक्षणांना आमंत्रण ठरते
Batti Varieties Explained How Steamed, Roasted, and Fried Batti Compare
Batti is simple, filling, and deeply comforting, especially in winter. At its core, batti is a firm dough ball or dumpling made with flour, fat, salt, and spices, then cooked by steaming, roasting, or frying. In many Indian homes, it is eaten with dal, kadhi, chutney, ghee, or a seasonal vegetable curry.
What goes into batti
The basic dough usually includes:
Wheat flour, jowar, bajra, or a mix of grains
Salt, ajwain, cumin, turmeric, or chilli powder
Ghee or oil for softness
Water or curd to bind the dough
Some versions include methi leaves, sesame seeds, garlic, or crushed peanuts. The dough is kneaded stiff, shaped into balls, and cooked using the chosen method. A little ghee is often added before serving, but portion size matters.
How steamed, roasted, and fried batti compare
Steamed batti is the lightest option. It stays soft, uses little oil, and suits people who prefer easier digestion. It works well with dal or thin curry.
Roasted batti has a smoky flavour and firm bite. It is usually cooked over coal, in a tandoor, or in an oven. This is the classic choice for a hearty winter meal, especially with dal and ghee.
Fried batti is crisp, rich, and festive. It tastes great, but it absorbs more oil. Keep it occasional rather than daily.
Which type is healthier
For regular eating, steamed or roasted batti is usually the better choice. Use whole grains like bajra or jowar for fibre, and serve with protein-rich dal.
People with acidity, weak digestion, high cholesterol, or weight-management concerns should limit fried batti. Those with diabetes should watch portion size and pair batti with dal, curd, or vegetables rather than eating it alone.
Winter tips for eating batti
In winter, try bajra or jowar batti with garlic chutney, dal, or leafy vegetable curry. Add sesame, ajwain, or methi for warmth and flavour. Keep ghee modest, and eat batti hot, as it becomes heavier when cold.
FAQ
Is batti the same as baati?
They are closely related. Baati is a popular Rajasthani version, while batti can refer to similar dough balls made in different regional styles.
Can batti be made without ghee?
Yes. Use a small amount of oil or curd in the dough. Add ghee only when serving, if desired.
Which batti is best for children?
Steamed or soft roasted batti is better for children. Serve it broken into small pieces with dal or curd.
Can batti be eaten at night?
Yes, but keep the portion small. Avoid fried batti at night if digestion is slow.
Batti can be everyday food or festive comfort food. Choose the cooking method based on your health, appetite, and season. For most homes, roasted or steamed batti gives the best balance of taste and nourishment.

Comments