top of page
logo.png

Balanced Lifestyle Tips for Cancer Prevention

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 6
  • 4 min read

कॅन्सरपासून बचाव

 

नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर - -  आजच्या भागात आपण कॅन्सर म्हणजेच कर्करोग होऊ नये -   म्हणून काय काळजी घ्यावी -  -  आपला आहार विहार कसा असावा याबद्दल बघणार आहोत

आपली जीवन जगण्याची शैली नियमित असेल तर कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो - -  संतुलित आहार - - - संतुलित व्यायाम आणि संतुलित मनःस्वास्थ - - - हे कॅन्सरपासून धोका कमी करण्याची गुरुकिल्ली आहे   ---  सर्वप्रथम संतुलित सुयोग्य आहार बद्दल बघू या  

आहार हा योग्य वेळेला - - - भूक लागल्यानंतरच - - - ऋतूनुसार आणि ज्या देशात आपण राहत आहोत त्याला अनुसरून असावा - - - प्रामुख्याने आहारामध्ये लसूण - कांदा - - - वेगवेगळ्या प्रकारची आणि ज्या ऋतुत येतात ती सर्व फळं उदाहरणार्थ पपई - - किवी - - संत्री -  आंबा - - द्राक्ष टरबूज - - टोमॅटो इत्यादी - - - अनेक प्रकारच्या बेरी उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी मलबेरी इ. सर्व प्रकारचे मसाल्याचे पदार्थ प्रामुख्याने हळद - -  सर्व प्रकारच्या फळभाज्या उदाहरणार्थ भोपळा - - गिलके इत्यादी - अन्य भाज्यांमध्ये कोबी - - ब्रोकोली - - अद्रक - - गाजर - - - रताळे इत्यादी आहारामध्ये असावेत  - -  जवळपास ३५ टक्के कॅन्सर हे आहाराशी निगडीत असतात - - त्यामुळे आहारामध्ये थोडा बदल केला तरी देखील कॅन्सर कमी करता येऊ शकतो - - - आहारामध्ये फॅट्स वाढणाऱ्या पदार्थांना टाळावेत तसेच तेलकट तिखट तळलेले पदार्थ प्रमाणातच सेवन करावेत  

नियमित व्यायाम - - कोणत्याही प्रकारचे व्यसन नसणे - - - उदाहरणार्थ तंबाखू गुटखा धूम्रपान मद्यपान इत्यादी पथ्य पाळल्यास कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

वयाच्या ३५ नंतर नियमित शरीराच्या तपासण्या करून घेणे आवश्यक असते - - - ज्या व्यक्तींना कॅन्सरची म्हणजेच कर्करोगाची अनुवंशिकता असेल त्यांनी विशेष काळजी आणि तपासण्या करून घ्याव्यात  

व्यायामामध्ये प्रामुख्याने सकाळच्या वेळी स्वच्छ हवेमध्ये पायी फिरायला जाणे- -  आपल्या हृदयाचे ठोके ९२ ते ९५ च्या दरम्यान भरतील एवढे जलदगतीने चालावे - - -   अन्य व्यायामामध्ये योगासन आणि पोहण्याचा व्यायाम उत्तम असतो  

कोणत्याही प्रकारे मानसिक ताण तणावाला दूर ठेवावे - - मानसिक ताण तणावाचे व्यवस्थापन तज्ज्ञांच्या सल्ल्याने आवश्यकते नुसार केल्यास कॅन्सर पासूनचा धोका कमी होतो  

भारताबद्दलच्या विचार केल्यास कर्करोग हा हृदयविकाराच्या आजाराने नंतरचा दुसरा सर्वात मोठा आजार आहे म्हणून प्रत्येक भारतीयाने आता सांगितलेल्या पध्दतीने आपला आहार व्यायाम आणि मानसिक ताणतणाव याचे सुयोग्य नियोजन केले तर कॅन्सरपासून दूर राहता येईल  

थोडक्यात काही महत्त्वपूर्ण गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत  

१. प्रक्रिया केलेले मांस तसेच केमिकल युक्त पदार्थांना वर्ज्य करावेत  

२. सर्व प्रकारची व्यसने टाळावीत  

३. स्वच्छ आणि त्याचा आहार वेळेवर घ्यावा - - आहारात लसूण टोमॅटो गाजर पालक हळद वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बेरी डाळिंब संत्री इत्यादींचा समावेश करावा  

अशा प्रकारे संतुलित आहार संतुलित व्यायाम आणि संतुलित मन:स्वास्थ्य कॅन्सरला दूर ठेवते  

 

 

 

 

 

Balanced Lifestyle Tips for Cancer Prevention

Cancer prevention does not depend on one food, one habit, or one test. It begins with a balanced daily routine that supports the body over time. Dr Satish Vasant Shindadkar’s approach highlights a simple truth: healthy living can help reduce cancer risk, especially when followed consistently.

This article is for general awareness and does not replace medical advice. Anyone with symptoms, previous illness, or a family history of cancer should consult a qualified doctor.

Eat with balance, timing, and the season

A cancer-preventive diet is not about strict restriction. It is about eating fresh, varied, and timely meals.

Try to keep regular meal timings. Long gaps, late heavy dinners, and frequent overeating can disturb digestion and energy balance. A lighter dinner, eaten earlier, is often easier on the body.

Seasonal food also matters. In India, nature provides different foods through the year for a reason. Include:

Garlic and onions, which add flavour and provide beneficial plant compounds

Seasonal fruits such as papaya, guava, oranges, apples, mangoes, and berries when available

Vegetables of many colours, including leafy greens, carrots, beetroot, pumpkin, beans, capsicum, and gourds

Whole grains, pulses, nuts, seeds, and adequate water

Turmeric deserves special mention. Curcumin, the active compound in turmeric, has been studied for its anti-inflammatory properties. Use turmeric as part of regular cooking, along with black pepper, cumin, coriander, ginger, and other traditional spices. Spices work best as part of a wholesome diet, not as a cure.

Move daily and avoid harmful addictions

Regular exercise helps maintain healthy weight, improves immunity, supports digestion, and reduces stress. Aim for a mix of walking, stretching, strength work, yoga, or cycling. Even 30 minutes of brisk walking most days is a strong start.

Avoid tobacco in every form. Limit or avoid alcohol. These choices have a major role in lowering cancer risk.

Manage stress and sleep well

Chronic stress can affect appetite, sleep, hormones, and immunity. Build small calming habits into the day, such as breathing exercises, prayer, meditation, gardening, music, or time with family. Good sleep is also part of prevention, not a luxury.

Do not skip check-ups after 35

After age 35, regular health check-ups become more important. This is especially true for people with a family history of cancer. A doctor may suggest screening based on age, symptoms, gender, lifestyle, and risk factors.

Early detection often gives better treatment options.

FAQ

Can diet alone prevent cancer?

No. Diet can reduce risk, but prevention also needs exercise, no tobacco, stress control, sleep, and regular screening.

Is turmeric enough for cancer prevention?

No. Turmeric can be part of a healthy diet, but it should not replace medical care, screening, or balanced nutrition.

When should cancer screening begin?

Many adults should consider routine check-ups after 35. Those with a family history should ask their doctor earlier about suitable screening.

Simple steps to begin today

Start with one change and build from there:

Eat fresh, seasonal meals at regular times

Add vegetables to both lunch and dinner

Use garlic, onions, turmeric, and spices in everyday cooking

Walk for 30 minutes most days

Avoid tobacco and reduce alcohol

Sleep on time and manage stress

Book routine check-ups after 35

Small habits, repeated daily, create powerful protection over the years.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page