top of page
logo.png

दृष्टिकोन आस्तिकतेचा आणि नास्तिकतेचा

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 4
  • 5 min read

दृष्टिकोन आस्तिकतेचा आणि नास्तिकतेचा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आस्तिकता आणि नास्तिकता याबद्दलचा दृष्टिकोन बघणार आहे

विशेषतः आयुर्वेदाच्या संदर्भात थोडक्यात चर्चा करणारा आहोत

आयुर्वेद शास्त्रातील जी प्रमुख ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथांच्या

रचनेत अगदी सुरुवातीलाच ईश्वराला स्मरून पुढील

आरोग्याच्या संदर्भातील व्याख्यानांना आरंभ केलेला आढळतो

याचाच अर्थ असा होतो की आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

ईश्वर ही संकल्पना निश्चितच आहे त्याचे अस्तित्व आहे त्यामुळे

आयुर्वेद हा ईश्वर संकल्पनेला मानतो

अनेक लोकांमध्ये काही व्याधींच्या संदर्भात उपचार करीत असताना

शिवशंकर इत्यादी देवतांच्या आराधनांचे देखील उल्लेख केलेले आहेत

अनेक ठिकाणचे संदर्भ घेऊन त्याचा सारांश थोडक्यात असा होऊ शकतो की

मनुष्याला स्वस्थ राहण्यासाठी आपले स्वास्थ्य

टिकवून ठेवण्यासाठी किंवा आपण स्वतः आरोग्य संपन्न होण्यासाठी

शरीरासोबत मनाचे स्वास्थ्य / / / आरोग्य टिकवणे

अत्यंत आवश्यक आहे आणि आपली कुठे तरी आस्था असेल तरच हे शक्य आहे

म्हणजे आपण कुठल्यातरी एखाद्या परमशक्तीला

मानत असाल त्यावर विश्वास ठेवत असाल तर

आपले स्वास्थ्य उत्तम राहू शकते हे लक्षात येते

या जगामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी ह्या संयोगाने

झालेल्या नाहीत

या अशाच निर्माण झालेल्या नाहीत 

कुठल्याही कारणाशिवाय एखादी गोष्ट घडणं हे शक्य नसतं

आपल्या मानवाच्या शरीराची रचना हा काही संयोग असेल

असे निश्चित नाही

आपल्या शरीरात असणाऱ्या प्रत्येक अवयवाची विशिष्ट कार्य आहेत आणि

त्यानुसारच ती रचना करण्यात आलेली आहे म्हणजेच

याचा कोणीतरी रचनाकार निश्चित आहे

शरीरात असणारे पंच ज्ञानेन्द्रिय जसे नेत्र / / /डोळे हे बघतात

कान ऐकतात

त्वचा स्पर्शज्ञान करून देतात

जीभ चवीचं म्हणजेच रसज्ञान करून देते 

नाकाद्वारे आपण एखाद्या गोष्टीचा सुगंध / दुर्गंध समजून घेऊ शकतो

हृदय जन्मल्यापासून म्हणजेच जीव निर्माण झाल्यापासून तर मृत्यूपर्यंत

सातत्याने आपले काम करीत असते  इत्यादी सर्व गोष्टी

संयोगाने / / // सहज संयोगाने आपोआप निर्माण झाल्या असतील

असं म्हणणं कोणत्याही सुज्ञ व्यक्तीला कदापि शक्य नाही

या सृष्टीत पृथ्वी / / / पृथ्वीवरील वातावरण

सूर्याभोवती तिचं फिरणं

स्वतःभोवती फिरणे

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत

त्यात असणारे हिवाळा / / / उन्हाळा/ / / / पावसाळा इत्यादी ऋतू

विविध प्रकारचे प्राणी / / / पक्षी / / / वनस्पती

मनुष्यासाठी अन्न औषधी आणि त्या मनुष्यापासून पुढील जीवाची उत्पत्ती इत्यादी

सर्व गोष्टी या संयोग निश्चितच नाहीत 

याचा कोणीतरी करता करविता निश्चित आहे

आणि मला वाटतं की या जगामध्ये सुपर पॉवर कोणीतरी आहे असे

सर्वच व्यक्ती मानतात त्यामुळे कुणीही नास्तिक आहे असे तरी

मला वाटत नाही फक्त

त्यांची या जगाकडे बघण्याची दृष्टी थोडी वेगळी असू शकते

जेव्हा शरीर शास्त्राचे ज्ञान आपण करीत असतो

चिकित्सक चिकित्सा देत असतात त्यावेळेला

त्यांच्या असं लक्षात येतं की शरीरामध्ये असणाऱ्या

श्वास प्रक्रिया इत्यादी अनेक गोष्टींवर खरोखरच कुणाचे तरी नियंत्रण निश्चित आहे

ज्या पद्धतीने शरीर रचना आणि शरीर क्रिया सुरू असते त्यावर

हे चिकित्सक औषधांच्या मार्फत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू शकता परंतु

अंतिम निर्णय हा दुसऱ्या कोणाच्या तरी हातात आहे असेच

शेवटी निष्कर्ष निघतात

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख आणि दुःख येत असतात जे

या जगातील सुपर पावर ला ज्याला

कोणी ईश्वर / / /  परमेश्वर / / //   देवता इत्यादी नामकरण केलेल्या आहेत

त्यांच्यावर विश्वास ठेवल्यास निश्चितच

त्यांच्यावर आलेल्या आघाताला / दुःखाला ते सहज पचवू शकतात असे

प्रत्यक्ष आपण बघतच असतो आणि

ज्यांचा कुणावरच विश्वास नसतो ते या दुःखाला सहन करू शकत नाही

किती तरी उदाहरण देता येतील की जी आपल्या हातात नसतात

अशी कोणतीही गोष्ट जी आपणास अशक्य वाटत असते ती

सहज शक्य होऊन जाते आणि जी सहज शक्य वाटत असते

ती होत नाही म्हणजेच या सृष्टीचा कोणीतरी कर्ता नियंत्रा आहे

आयुर्वेद म्हणजेच आयुष्याचे ज्ञान या ज्ञानसागरात

आपणास आपल्या शरीराविषयी

सृष्टी विषयी

सजीवां विषयी उहापोह मिळतो आणि सर्वांचा

सारांश एवढाच निघतो की आपण आपले कर्तव्य करीत रहावे

त्या प्रती फल ईश्वर नक्कीच देणार आहे.

 

The Perspective of Theism and Atheism

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at the perspective of theism and atheism, particularly with a brief discussion in the context of Ayurveda.

In all the major texts of Ayurveda, it is observed that right at the beginning of their composition, God is remembered before commencing the discourse related to health.

This implies that, from the perspective of Ayurveda, the concept of God certainly exists. Therefore, Ayurveda accepts the concept of God.

While treating certain diseases, references are also made to the worship of deities such as Lord Shiva and others.

By considering references from various places, the brief conclusion can be summarized as follows:

For a person to remain healthy, to preserve their health, or to become physically healthy, it is extremely important to maintain not only the health of the body but also the health of the mind. This is possible only if one has faith in something.

 

That is, if you believe in some supreme power and have faith in it, your health can remain better.

Everything that exists in this world has not come into being merely by chance.

These things have not simply appeared on their own.

It is not possible for something to happen without any cause.

The structure of the human body certainly cannot be considered a mere coincidence.

Every organ in our body has a specific function, and accordingly it has been designed. This means that there is certainly a creator behind it.

The five sense organs in the body function in distinct ways: the eyes see, the ears hear, the skin provides the sense of touch, the tongue perceives taste, and through the nose we can recognize pleasant and unpleasant smells.

From the moment life begins until death, the heart works continuously.

To say that all these things came into existence by mere coincidence or happened automatically is something that no sensible person could ever accept.

In this universe, the Earth, the Earth's environment, its revolution around the Sun, its rotation on its own axis, the principle of gravity, the seasons such as winter, summer, and the rainy season, the various kinds of animals, birds, and plants, the food and medicines available for humans, and the generation of future life through humans—all these things are certainly not mere coincidences.

 

There is certainly someone who creates and governs all of this.

And I believe that everyone accepts that there is some supreme power in this world. Therefore, I do not think anyone is truly an atheist; it is just that their perspective on the world may be somewhat different.

When we study anatomy and when physicians provide treatment, they realize that many processes within the body, such as breathing, are indeed under someone's control.

Doctors can attempt to influence the body's structure and functions through medicines, but in the end, the final decision rests in someone else's hands.

Every person's life includes both happiness and sorrow.

If one has faith in the supreme power of this world—whom people call God, the Supreme Being, or a deity—they can certainly endure the hardships and sorrows that come their way more easily. We witness this in practice.

Those who have faith in no one often find it difficult to bear such suffering.

There are countless examples of things that are beyond our control. Something that seems impossible to us may become possible with ease, while something that appears easily achievable may not happen at all. This indicates that there is someone who creates and governs this universe.

Ayurveda, the knowledge of life, is an ocean of wisdom in which we gain insight into our body, the universe, and living beings.

The essence of it all is simply this: we should continue performing our duties, and God will surely grant us the appropriate fruits of our actions.

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page